अजित दादांच्या कट्टर चाहत्याने थेट रक्ताने पत्र लिहत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…
बारामती ( प्रतिनिधी ) :- दि.27 जुलै- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांचा वाढदिवस नुकताच विविध सामाजिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. कुठे वृक्षारोपण करण्यात आले, कुठे आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर तसेच जनजागृतीपर कार्यक्रमांनी यंदाचा वाढदिवस संपन्न झाला. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या. परंतु अशीच एक वेगळी संकल्पना राबवत आपल्या लाडक्या नेत्याला थेट स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून आपण मुख्यमंत्री व्हावेत अशी शुभेच्छा दिली आणि आपल्या नेत्या प्रती आपण किती कट्टर आहोत हे इतरांपेक्षा वेगळं करून दाखवून दिलं.
बारामतीमधील माजी नगरसेवक अभिजीत काळे यांनी चक्क स्वतःच्या रक्ताने अजित दादांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या व आपल्या मनातील भावना व्यक्त केल्यात. अशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या नंतर गेल्या दोन दिवसापासून बारामती व परिसरात अभिजीत काळे हे सर्वांच्याच चर्चेचा विषय बनले आहेत. अभिजीत काळे हे अजितदादांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत. सध्या सोशल मीडियावर ” शेठ तुम्ही नादच केलाय थेट ” हे गाणं चर्चेत आहे. या गाण्याचा संदर्भ देत सर्वच लोक अभिजीत काळे यांना अशाच प्रतिक्रिया देऊन अभिनंदन करत असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अभिजित काळे यांनी सांगितले.