विशाल जाधव आयोजित महाआरोग्य शिबीर ठरले महाराष्ट्रात चर्चेचा विषय
कारण ….
बातमी 1 – कार्यकर्त्याची इच्छा केली पूर्ण, अजित दादांना चहा पिण्याचा मोह न आवरला….
बातमी 2 – खाजगी सावकारी केली तर याद राखा गाठ माझ्याशी आहे – अजितदादा पवार ….
बातमी 3 – पहाटे 6 वाजता देखील महिलां कार्यक्रमास हजर….
बातमी 4 – खूप दिवसांनी जनतेसोबत डायरेक्ट बोलत आहे. त्यामुळे खूप बोलायचं आहे – अजितदादा पवार …..
वरील 4 ही बातम्या सर्व मीडिया वर गाजल्या व यासर्व बातम्या विशाल जाधव आयोजित महाआरोग्य शिबिरात घडल्या. व या शिबिराची तयारी फक्त 2 दिवसात केली होती.
मुख्य बातमी ….
बारामती ( प्रतिनिधी, इंद्रभान लव्हे ) –
रविवार दिनांक 25 जुलै 2021 रोजी बारामती नगरी मधील देसाई इस्टेट या ठिकाणी विनामूल्य महाआरोग्य शिबिर संपन्न झाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहराचे कार्याध्यक्ष श्री विशाल पोपटराव जाधव व देसाई इस्टेट मित्र परिवाराच्या वतीने या विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महा आरोग्य शिबिराच्या उद्घाटन समयी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार उपस्थित होते. त्यांच्यासमवेत बारामती नगरीच्या नगराध्यक्षा सौ पौर्णिमाताई तावरे, प्रशांत काटे, संभाजी होळकर , सचिन सातव, इम्तियाज शिकीलकर, बाळु जाधव, अनिता गायकवाड, भाग्यश्री धायगुडे व इतर मान्यवर उपस्थित होते. या महाआरोग्य शिबिरामध्ये ९ हॉस्पिटल्स चा समावेश होता. त्यामध्ये बालरोगतज्ञ, स्रीरोग तज्ञ, एमडी मेडिसिन, कार्डिओलॉजिस्ट, हृदय रोग तज्ञ, डेंटिस्ट, फिजिओथेरपिस्ट अशा डॉक्टरांचा समावेश होता.
या शिबिराचा 600 लोकांनी लाभ घेतला. आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्य व्यवस्थित राखायचे असेल तर रोज व्यायाम व प्राणायाम करणे आवश्यक आहे असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार म्हणाले. या शिबिराच्या निमित्ताने गरजू व गरीब लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल तसेच एकाच ठिकाणी अनेक आजारांवर निदान व उपचार करणारे डॉक्टर या महा आरोग्य शिबिराच्या निमित्ताने एकत्रित आणल्याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी श्री विशाल जाधव व मित्र परिवाराचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.विशाल जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन शंकर घोडे (सर) यांनी केले.