रविवार दिनांक 25 जुलै, 2021 रोजी होणाऱ्या महा आरोग्य शिबिराच्या निमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरोग्य शिबीराचा उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार तसेच बारामती शहराचे व तालुका पदाधीकारी नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक व राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहराचे कार्याध्यक्ष श्री. विशाल पोपटराव जाधव यांनी दिली. बारामती शहरातील गरजू, गरीब तसेच स्थानिक नागरिकांना एकाच ठिकाणी वेगवेगळ्या आजारांवरील डॉक्टरांकडून विनामूल्य सेवा व औषधे मिळावीत तसेच पुढील उपचार सवलतीच्या दरात व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती विशाल जाधव यांनी दिली.
या महाआरोग्य शिबिरांमध्ये बाल रोग तज्ञ, कार्डिओलॉजिस्ट, हृदयरोग तज्ञ, एमडी मेडिसिन, फिजिओथेरपिस्ट, स्रीरोग तज्ञ तसेच बारामती हॉस्पिटल मधील नामवंत डॉक्टर आरोग्य तपासणी करणार आहेत. या सुवर्ण संधीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहराचे कार्याध्यक्ष श्री विशाल पोपटराव जाधव यांनी केलेले आहे.