J J T V S च्या वतीने माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

बारामती दि 21
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन बारामती आणि परिसरामध्ये करण्यात येते यावर्षी अजितदादा पवार यांनी कोरोना पार्श्वभूमीवर परिपत्रक काढून वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे आव्हान केले त्याचबरोबर आपला वाढदिवस कमी गर्दी करून साजरा करावा असे देखील सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर जे जे TVS च्या वतीने कोरणा नियमांचे पालन करून मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले यावेळी वड,पिंपळ,भेंडी,चींच या स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात लागवड करण्यात आली आहे अशी माहिती J J TVS चे संचालक विपुल शहा यांनी दिली


यावेळी बारामती नगरीचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव माजी नगरसेवक दीपक मलगुंडे, डॉ.जयप्रकाश शहा,विशाल वडूजकर ,शोरूमचे ग्राहक श्री घोळवे,मित्र परिवारांना मध्ये श्री वैभव पळसे व श्री अमोल भुजबळ त्याचबरोबर योध्दा प्रोडक्शनचे नानासाहेब साळवे, मधुकर बोंद्रेषउपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन श्री अजित पोळ यांनी केले तर आभार विपुल शहा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *