आज दि. 16 जुलै 2021 रोजी ज्ञानयोग शैक्षणिक व सामाजिक संस्था बारामती संचलित उर्जा भवन जवळ, कमल बजाज शोरूम समोर, भिगवन रोड बारामती या ठिकाणी माननीय वसंतराव देवकाते पाटील व शेतकरी योद्धा चे संपादक माननीय योगेश नालंदे सर यांच्या हस्ते संपन्न झाला…
या ठिकाणी 10 वी,12 वी पास/नापास व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी फायर इंजीनियरिंग व सेफ्टी मॅनेजमेंट चे विविध डिप्लोमा व कोर्सेस उपलब्ध आहेत, हे कोर्स करून विद्यार्थ्यांना शासकीय, औद्योगिक व खाजगी क्षेत्रात उत्तम करियर करून देश-विदेशात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य जी.एच कुंभार सर व उपप्राचार्य एम. बी. राऊत सर यांनी दिली व विद्यार्थ्यांना फायर सेफ्टी मधील विविध कोर्स करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना ऑफिस मध्ये प्रत्यक्ष भेटून किंवा ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची सुविधा उपलब्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले… उदघाटन प्रसंगी श्री वसंतराव देवकाते, योगेश नालंदे, बारामती पोलीस कॉन्स्टेबल शंकर भोसले, प्राचार्य कुंभार सर ,उपप्राचार्य राऊत सर, सेफ्टी ऑफिसर रामचंद्र गोडसे, भगवान कुंभार, संजय कुंभार, दत्तात्रय अभंग, भिवाजी राऊत, रमेश कुंभार व इतर मान्यवर उपस्थित होते…