बारामती, प्रतिनिधी – बारामती तालुका शिक्षक सोसायटीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल सौ.दिपाली संतोष गायकवाड यांचा बा.न.प.चे गटनेते. श्री. सचिनशेठ सातव व नगरसेवक सुरज सातव यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सोसायटीच्या चेअरमन, दिपालीताई साळुंखे, सचिव संतोष कुमार राऊत, शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब मारणे, बा.न.प. संघाचे अध्यक्ष ढोलेसर, संघटनेच्या महिला सदस्या सौ. अश्विनी गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ गायकवाड यांचा सन्मान
Byसंपादक-योगेश नामदेव नालंदे
Aug 26, 2021