प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय दौंड व मंडळ कृषी अधिकारी कार्यालय पाटस यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य सन २०२३-२०२४ अंतर्गत रब्बी हंगाम ज्वारी पीक प्रात्यक्षिक प्रकल्प शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी दिन हिंगणीगाडा येथे दिनांक १४/ ०२/२०२४ घेण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी प्रमुख मार्गदर्शक श्री पोपट लकडे माती परीक्षण व विश्लेषण महाराष्ट्र बँक भिगवन हे उपस्थित होते. सदर प्रशिक्षणामध्ये व्याख्याते यांनी माती परीक्षण विषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच माती नमुना कशासाठी घ्यावयाचा ,नमुना घेण्याची पद्धत जागा निवड तसेच माती परीक्षणानुसार तपासलेले जाणारे घटक, जमिनीतील अन्नद्रव्य याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . त्यानंतर श्री राहुल लोणकर कृषी सहाय्यक हिंगणीगाडा यांनी ज्वारी प्रकल्पाविषयी माहिती दिली व शेतकऱ्यांना ज्वारीचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले यामध्ये ज्वारी मध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण जास्त प्रमाण असून त्यांचे विघटन कमी वेगाने होत असल्याने मानवाचे बरेचसे आजार कमी होतात, खनिज आणि तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने शरीराचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि मधुमेही रुग्णांसाठी ज्वारी उपयुक्त ठरते तसेच ज्वारीमध्ये खनिज द्रव्य आणि तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असून पिष्टमय पदार्थ ७२.६% प्रथिने ११.६% स्निग्ध पदार्थ १.९% इतके असते याविषयी मार्गदर्शन केले तसेच सध्याच्या काळात कमी किमतीत पौष्टिक अन्न मिळणे गरजेचे आहे यासाठी मिश्र पीठ पद्धत योग्य ठरते मिश्र पीठ पद्धत यामध्ये ज्वारी -बाजरी- गहू मका -रागी यांचं योग्य प्रमाणात मिश्रण करून पीठ तयार करता येते या मिश्रि पिठापासून उत्कृष्ट प्रतीची भाकरी /रोटी तयार करता येते याविषयी जमलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन , तसेच ज्वारीचे आहारातील महत्त्व “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” ज्वारीचे आहारातील महत्व या विषयी माहितीपत्रक शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले तसेच कृषी विभागाच्या योजना यामध्ये पीएम किसान ,महाडीबीटीविषयी, मार्गदर्शन केले व उपस्थित मार्गदर्शक व शेतकरी बंधू यांचे आभार मानून शेती दिनाचा कार्यक्रम संपला.