प्रतिनिधी – राजमाता जिजाऊ या शूरवीर ,आदर्श माता व कुशल प्रशासक होत्या त्यामुळे त्यांचे विचार आजही प्रेरक आहेत असे प्रतिपादन बारामती नगर परिषदेच्या मा. नगराध्यक्ष जयश्री सातव यांनी केले. रविवार दि. २८ जानेवारी रोजी अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती महिला शाखा च्या वतीने महिला मेळावा, राजमाता जिजाऊ पुरस्कार वितरण, आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून जयश्री सातव यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड. प्रियंका काटे, शहर अध्यक्षा अर्चना सातव, बारामती तालुका अध्यक्षा ऍड सुप्रिया बर्गे ,युवती अध्यक्षा शिवानी कदम व सदस्या ज्योती जाधव, ऍड विना फडतरे ,स्नेहल सातव ,नम्रता ढमाले, वैशाली सावंत, मनीषा शिंदे ,कल्पना माने, शोभा मांडके, नलिनी पवार ,सीमा सातव, राजश्री परजणे अर्चना डुके,राणी भापकर व जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण,मा. हेमलता परकाळे, मा. नगरसेविका आरती शेंडगे, आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.
संघर्ष करणाऱ्या महिलांचा जीवन प्रवास इतर महिलांना माहीत व्हावा म्हणून सदर कार्यक्रम घेत असल्याचे पुणे जिल्हा अध्यक्षा ऍड प्रियांका काटे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव भेटावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्रास्ताविक मध्ये अर्चना सातव यांनी सांगितले.
या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्र: डॉ दीपाली जाधव जगताप, कृषी क्षेत्र: आशा खलाटे, क्रीडा क्षेत्र: प्रणाली रणदिवे, महिला कापड व्यवसाय: ऋतुजा काकडे व दुग्ध व्यवसाय: हुस्नेबी शेख या महिलांना ओटी भरून पुरस्कार देण्यात आला.
जिद्द चिकाटी आत्मविश्वासाच्या जोरावर संघर्षमय परिस्थितीमध्ये सुद्धा स्त्री मार्ग काढते आणि यश मिळवते आणि मिळवलेले यश टिकवते असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना डॉ.दिपाली जाधव जगताप यांनी सांगितले.
व्यवसाय करताना शिक्षण नसले तरी चालते तुमच्या कडे चिकाटी असेल तर यश हमखास येणारच असल्याचे दुग्ध व्यवसायिक हुस्नेबी शेख यांनी सांगितले.
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले. व आभार शिवानी कदम यांनी केले