इंदापूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने, युवकचे प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा साहेब तसेच राज्य महासचिव राजेंद्रजी पतोडे, निरीक्षक ऋषिकेश दादा नागरे पाटील यांच्या सुचने नुसार पुणे जिल्हातील तालुका शहर बांधणी चालू आहे त्याच अनुषंगाने दि.21/01/24 रोजी इंदापूर शहर व तालुका बांधणीसाठी इंदापूर येथे मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये व अध्यक्षतेखाली घेण्यात आला या कार्यक्रमासाठी इंदापूर शहर व तालुक्यातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांचे स्वागत करून जिल्हा नियुक्ती झालेल्या सर्वांचे सत्कार करून करण्यात आली या कार्यक्रमध्ये विविध जाती धर्मातील युवकांनी सहभाग घेऊन मुलाखती दिल्या
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी करून युवा आघाडी मोठ्या ताकतीने वाढवून जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचे प्रतिपान केले तसेच सामान्य नागरिकांचे व युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करून वंचित बहुजन युवा आघाडी वाढवणार असल्याचे सांगितले व मुलाखतीस आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच पुणे जिल्हा महासचिव प्रतीक चव्हाण यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा उपाध्यक्ष माननीय गणेश थोरात, सहसचिव कृष्णा साळुंके, संघटक रोहित माने, बारामती तालुका संघटक सागर गवळी तसेच वंचित बहुजन आघाडी इंदापूर शहराध्यक्ष सुभाष खैरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार इंदापूर शहर उपाध्यक्ष कीर्ती कुमार वाघमारे यांनी केले
तसेच कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष श्री किरण मिसाळ यांनी केले.