प्रतिनिधी – दिनांक १६ व १७ जानेवारी २०२४ रोजी तुळजाराम चतुरचंद कनिष्ठ महाविदयालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा ‘अनेकान्त आविष्कार’ हा उपक्रम पार पडला. प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. ‘तंत्रस्नेही विदयार्थी आणि आधुनिक भारत’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या उपक्रमातील विविध स्पर्धेत व प्रकल्प सादरीकरणात ९४५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ व कृतिशील बनून देशासाठी योगदान दयावे, तसेच तंत्रस्नेही बनून आपला व्यक्तिमत्त्व विकास साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. जगताप यांनी यावेळी केले.
कला विज्ञान, वाणिज्य व व्यवसाय शिक्षण शाखेतील विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण ८० पेक्षा अधिक वर्किंग मॉडेल्स या प्रदर्शनात मांडली होती. प्रदर्शनाची पाहणी करताना प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्या डॉ. योगिनी मुळे उपप्राचार्य, डॉ. सचिन गाडेकर उपप्राचार्या वैशाली माळी यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करून प्रेरणा दिली. यावेळी प्रश्नमंजुषा, रांगोळी, मेहंदी काव्यवाचन, सुंदर हस्ताक्षर, पाककला, कराओके, इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून रसिक – प्रेक्षकांची मने जिंकली.
संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मा.श्री.मिलिंद शाह (वाघोलीकर) यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. अनेकान्त आविष्कार समितीचे प्रमुख श्री.पांडुरंग ओवेकर यांनी उत्तम नियोजन केले. समन्वयक श्री. गोरखनाथ मोरे , श्री.संजय शेंडे व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.