प्रतिनिधी – आज दिनांक 15/1/2024 रोजी बारामती -दौंड- इंदापूर रिक्षा कृती समितीची स्थापना करण्यासंदर्भात मधुबन हॉटेल, बारामती येथे रिक्षा चालकांची बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीमध्ये बारामती- दौंड- इंदापूर या तीन तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व रिक्षा चालक उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कारभारी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव मा. प्रशांत ( नाना) सातव उपस्थित होते.
वरील तीनही तालुक्यातील रिक्षा चालकांचे आर्थिक व सामाजिक प्रश्न सोडविणे, शासन दरबारी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, रिक्षा चालकांसाठीचे कल्याणकारी मंडळ बाबतीत पाठपुरावा करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बारामती -दौंड -इंदापूर या तीनही तालुक्यातील रिक्षा चालकांना केंद्रबिंदू मानून व त्यांना संघटित करून सामाजिक प्रवाहात आणणे हा या कृती समितीचा मुख्य उद्देश आहे. ही कृती समिती पक्ष, संघटना, व राजकारण विरहित पद्धतीने कार्यरत राहणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सर्वांनुमते मा. प्रशांत( नाना) सातव यांची, तर सचिवपदी प्रा. डॉ . भिमराव मोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी अण्णा समिंदर, उत्तम लोंढे, किशोर कांबळे, मनोज साबळे, बाबासाहेब कोरी, जावेद सय्यद, राजेश बोर्डे, नितीन खडके, हरिश्चंद्र शिंदे, अभिजीत भंडारे, शांतीलाल सोनवणे इ. मान्यवर रिक्षा चालक उपस्थित होते.