रावणगाव येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत शेतकरी गटाचे प्रशिक्षण संपन्न.

प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यामार्फत रावणगाव येथे सेंद्रिय शेती विषय शेतकरी गटांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये नैसर्गिक शेती करणारे देवा फलफले यांनी नैसर्गिक शेती याबाबत मार्गदर्शन करताना नैसर्गिक शेतीमध्ये जीवामृत बिजामृत दशपर्णी अर्क याबाबत माहिती दिली. त्यानंतर गेले वीस वर्ष नैसर्गिक शेती करणारे व प्रवचनकार भाऊसाहेब आटोळे यांनी स्वतःचे नैसर्गिक शेतीचे अनुभव सांगून नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे हे शेतकऱ्यांना सांगितले. त्यानंतर आयुर्वेदिक डॉक्टर विजयकुमार आटोळे यांनी मानवी आरोग्य व नैसर्गिक शेती यांचा संबंध सांगून आपल्या आरोग्यासाठी नैसर्गिक शेती किती महत्त्वाचे आहे याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्राचे शेती विकास अधिकारी उमेश निकम साहेब यांनी नैसर्गिक शेती व बँकेच्या शेती विषयक योजना याबद्दल माहिती दिली लकडे यांनी माती परीक्षण याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांनी नैसर्गिक शेती योजनेअंतर्गत शेतकरी गट स्थापना व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी पाटस पोपट चिपाडे , आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर कृषी सहाय्यक अंगद शिंदे,अझरुद्दीन सय्यद ,प्रकाश लोणकर, अतुल होले, रावणगाव येथील प्रगत शेतकरी लक्ष्मण रांधवण, वैभव आटोळे नवनाथ नांगरे, रमेश कोकणे, माणिक सांगळे, ईश्वर रांधवण, तुकाराम धायतोंडे,महिला शेतकरी सीताबाई आटोळे व इतर महिला भगिनी,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक अंगद शिंदे यांनी केले तर आभार वैभव आटोळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *