प्रतिनिधी – दि.24. सुपे ता.बारामती येथे नेहरु युवा केंद्र पुणे.(युवक कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार.) व विद्या प्रतिष्ठान सुपे महाविद्यालय.राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ वा भारतीय स्वतंत्रच्या आमृत महोत्सव दिना निमित्त फिट इंडिया फ्रिडम रन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारत देशाला स्वतंत्रता मिळून ७५ वर्ष पुर्ण झाले, स्वतंत्रता चळवळीमध्ये तसेच देशासाठी बलिदान दिलेल्या विरांच्या स्मृतींना वंदन म्हणून हा कार्यक्रम राबविण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल पाटील व नेहरु युवा केंद्राचे उपसंचालक यशवंत मानखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.रामदास गांगुर्डे,नेहरु युवा केंद्राचे ता.प्रतिनिधी वैभव भापकर व शुभांगी मोरे यांनी केले,यावेळी प्राथ्यापक व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी व ग्रामस्त युवा वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *