तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या भक्ती गावडे ला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारतात पहिली

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनी शालेय राष्ट्रीय मैदानी स्पर्धांचे आयोजन तालुका क्रीडा संकुल विसापूर बल्लारशाह या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भक्ती गावडे हिची महाराष्ट्र राज्याच्या संघात शालेय राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली होती. भक्ती गावडे हिने राज्यस्तरावर ४५.१० मीटर थाळीफेक करून राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. तसेच तिची शालेय राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी थाळीफेक या क्रीडा प्रकारासाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झालेली होती. ६७ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतातील वेगवेगळी २८ राज्य सहभागी झालेली होते. थाळीफेक या प्रकारात या अ गटातून २५ खेळाडू व ‘ब’ गटातून २५ खेळाडू असे एकूण ५० खेळाडू सहभागी होते. ‘ब’ गटातून भक्तीने फायनल मध्ये प्रवेश करण्याकरिता ३९.५० मीटर थ्रो मारून ‘ब’ गटात पहिली आली. अंतिम स्पर्धेत भक्तीने ४५-१० मीटर थ्रो मारून १९ वर्षे वयोगटातून शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
तसेच असोसिएशनच्या राज्यस्तर स्पर्धेतून देखील भक्ती गावडे हिची तामिळनाडू या ठिकाणी होणा-या राष्ट्रीय खेलो इंडिया युथ गेम्स मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. भक्ती गावडे या पूर्वी देखील असोसिएशनच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेली आहे. तसेच मागील वर्षी झालेल्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत देखील ती सहभागी झाली होती. जिद्द, चिकाटी, सरावातील सातत्य यामुळे भक्ती ने यश संपादन केले आहे. या खेळाडूस डॉ.गौतम जाधव व प्रा.अशोक देवकर यांचे मार्गदर्शन लाभले. भक्ती ने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव, मिलिंद शाह वाघोलीकर, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *