बारामती: बारामती नगरपरिषद वाढीव हद्दीतील जळोची प्रभाग 5 मधील जळोची पिंपळी रोड येथील जमदाडे इस्टेट व चव्हाण इको पार्क कडे जाणारा अंतर्गत रस्ता करण्याची मागणी गेली अनेक वर्षापासून सातत्याने सदरच्या परिसरातील रहिवाशी नागरिकांकडून होत आहे.
बारामती नगर परिषदेला येथील परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा निवेदने तक्रारी अर्ज देऊन देखील सदर रस्त्याच्या कामासंदर्भात दखल घेतली जात नाही या परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा करण्यासाठी मोठी वर्दळ असते लोकवस्ती मोठी असल्याने येथील नागरिकांना नगरपरिषदेच्या सोयी सुविधा मिळणे गरजेचे आहे.
नगरपरिषदेने तात्काळ दखल घेऊन या परिसरातील पाहणी करून रस्त्याचे काम मार्गी लावावे यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे पाठपुरावा करत आहेत.