प्रतिनिधी – सामाजिक कार्यकर्ते व जय लहुजी फ्रेंन्ड सर्कलचे अध्यक्ष केदार पाटोळे यांना बारामती नगरपरिषदेच्या 159 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता दुत पुरस्कार प्रदान देण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्षा सौ भारती मुथा भाभी, माजी नगराध्यक्षा सौ पोर्णिमा ताई तावरे, माजी नगराध्यक्षा सौ संध्याताई बोबडे, यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी महेश रोडके व इतर मान्यवर उपस्थित होते.