प्रतिनिधी – गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल सेमी इंग्लिश & ज्युनियर कॉलेज पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या स्कूलमध्ये 2020 मध्ये घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये एकुण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये चार विद्यार्थ्यांनी नाविन्य मिळवलेले आहे.
त्यामध्ये
इयत्ता दुसरी मधील प्रणव विजय बनसुडे प्रथम क्रमांक

इयत्ता तिसरी मधील अशितोष संभाजी डोंगरे प्रथम क्रमांक

इयत्ता पाचवी मधील जान्हवी रविन्द्र कुमार तनपुरे प्रथम क्रमांक

इयत्ता सहावी मधील संयमी दीपक शहा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री हनुमंत लक्ष्मण बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे ,प्राचार्य सुरज बनसुडे, उपप्राचार्य दत्तात्रय शिंदे, विभाग प्रमुख राहुल वायसे, तेजस्विनी तनपुरे, वंदना कुंभार, ललिता लवटे, प्रवीण मदने, अक्षय काळोखे, सचिन क्षीरसागर, कैलास होले व पालक वर्ग मधून श्रीपाद शिंदे, गणेश चव्हाण, रविन्द्रकुमार तनपुरे, संगम शहा, संभाजी डोंगरे यांच्या उपस्थितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी व चेक स्वरूपात बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले व कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *