बारामतीत वंचित बहुजन युवा आघाडीचे 8 जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन

बारामती- बारामती मधील गट नं. 6/4/अ/1 मधील जागेमध्ये एस टी महामंडळने मूळ मालकांना विचारात न घेता व जागेचा कोणताही मोबदला न देता बेकायदेशीर ताबा घेऊन त्यावर एस टी बस्थानाकाचे कामचालू आहे या जागेचे 7/12 उतारे हे आज ही मूळ जमीन मालकांच्या नावावर आहेत या जागेचे कोणत्याही प्रकारचे संपादन/ हस्तांतरण झाले नाही त्यामुळे ही जागा आज ही मूळ मालकांच्या नावावरील महार वतनाची जागा आहे या संदर्भात 15 ऑगस्ट 23 रोजी उपोषण केले होते. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती शहरात निषेध मोर्चा देखील काढण्यात आला होता परंतु प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दिशाभूलीची उत्तरे देण्यात आली असल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या नेतृत्वामध्ये दि. 08/01/2024 पासून बारामती बसस्थानाकासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामधील मागण्या गट नं.गट क्र.६/३/अ, ब, ६/४/अ, ६/४/अ/१,२ मधील मूळ मालकांना जागेचा पाच पट मोबदला देण्यात यावा. गट क्र.६/३/अ, ब, ६/४/अ, ६/४/अ/१,२ मधील मालकी हक्काच्या जागेवर बेकायदेशीर ताबा घेऊन मालकांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर ऍट्रॉसिटी कायाद्या नुसार कार्यवाही करण्यात यावी. बारामती बस्थानकाची जागा ही महार वतनी असल्याने या महार समाजाचे श्रद्धास्थान विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव बसस्थानकास देण्यात यावे तसेच इतर मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे जो पर्यंत हा विषय मार्गी लागणार नाही तो पर्यंत हे बेमुदत आंदोलन चालू राहणार असल्याची माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी दिली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गणेश थोरात, सहसचिव कृष्णा साळुंके, शहर सचिव विनय दामोदरे, मोहन शिंदे, सागर गवळी, आनंद जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *