सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिलांचा सत्कार
बारामती: प्रतिनिधी, : मुलगी शिकली, प्रगती झाली व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करू लागल्या याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते व त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहे व सहेली फौंडेशन त्या कार्यास पात्र ठरत आहे त्यामुळे महिलां साठी चे महत्त्व पूर्ण असल्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या समनव्यक वैशाली अकिवाटे यांनी प्रतिपादन केले.
बुधवार दि.०३ जानेवारी रोजी डोर्लेवाडी येथे
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सहेली फाऊंडेशन आयोजित “यशस्वी महिला उद्योजिका व व्यवसाय” या संदर्भात मार्गदर्शन करताना वैशाली अकीवाटे बोलत होत्या.
या प्रसंगी सहेली फौंडेशन च्या अध्यक्षा रोहिणी आटोळे खरसे व डोर्लेवाडी ग्रामपच्यात च्या सरपंच सुप्रिया नाळे, उपसरपंच छबुताई मदने , सदस्या सुमित्रा वामण शोभा घनवट, तब्बुसुन शेख, उषा निलाखे ,सोनाली जाधव ,माया घनवट आदी उपस्थित उपस्तीत होत्या.
महिलांनी आर्थिक साक्षर व्याहवे त्यासाठी शासनाच्या विविध योजना चा लाभ घेणे साठी सहेली फौंडेशन नेहमी सहकार्य करणार असल्याचे सहली फाउंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी आटोळे खरसे यांनी सांगितले.
या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. आभार तबसुम शेख यांनी आभार मानले .