प्रतिनिधी – बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री मोरे पी पी उपस्थित होते. विद्यालयातील परीक्षेत प्रथम आलेल्या मुलींचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच बालिका दिन म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात काही मुलींचा सन्मान करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य मोरे पी पी, उपमुख्याध्यापक श्री देवडे के डी, पर्यवेक्षक श्री निवास सणस ,जेष्ठ शिक्षिका सौ.जयश्री हिवरकर, सौ.अर्चना पेटकर,व मुलींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इ 8 वी ड च्या मुलांनी आपली मनोगते सादर केली. विद्यालयातील उपशिक्षिका सौ.मीनाक्षी वाघमारे यांनी बालिका दिन च्या निमित्ताने मुली आज मुलांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षण घेत आहेत याचे सर्व श्रेय सावित्रीबाई व महात्मा फुले यांना जाते असे प्रतिपादन आपल्या भाषणात केले तर उपशिक्षक श्री हनुमान राठोड यांनी सावित्रीबाईंनी त्याकाळी मुलींना शिक्षण देण्यासाठी जे कष्ट घेतले ,त्यांना ज्या अडचणींचा सामना करावा लागला याची माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली.यावेळी प्राचार्य श्री मोरे यांनी अध्यक्षीय मनोगतात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणात असलेले योगदान स्पष्ट करत त्यांच्या विचारांची समाजाला असलेली गरज स्पष्ट केली.यावेळी कार्यक्रमाचे आभार कु.मोनिका झेंडे तर सूत्रसंचालन कु.चैत्राली भोसले यांनी केले.