प्रतिनिधी – आंतर महाविद्यालयीन अविष्कार 2023 संशोधन स्पर्धेमध्ये विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामती मधील विद्यार्थ्यांचे यश. दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न विद्या प्रतिष्ठानचे कृषीचे व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन अविष्कार 2023 संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या संशोधन स्पर्धेमध्ये 24 विविध महाविद्यालयांमधून 174 विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. या संशोधन स्पर्धेमध्ये युजी, पीजी, पीपीजी, अशा वर्गीकरण करून त्याचे सहा भाग केले होते. त्यामध्ये महाविद्यालयातील पूर्वा रवींद्र वानखेडे या विद्यार्थिनीला दुसरे तर अनुष्का रोहित पवार या विद्यार्थ्यांना तिसरे पारितोषिक मिळाले. विजेत्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्या डॉ. सुमन देवरुमठ व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यांना दिले तसेच विद्या प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष अँड. अशोक प्रभुणे, विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, सचिव अँड. नीलिमाताई गुजर, खजिनदार श्री. युगेंद्र पवार, सदस्य डॉ राजीव शहा, श्री. किरण गुजर, श्री. मंदार सिकची, रजिस्ट्रार कर्नल, श्रीश कंबोज यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.