राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नवीन प्रशासकीय भवन येथे कार्यक्रम संपन्न

बारामती, दि.२९: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, भूमी अभिलेख उपअधीक्षक संजय घोंगडे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य प्रमोद जाधव दिलावर तांबोळी यांच्यासह भाऊसाहेब फडके, किसन चौधरी, रामेश्वरी जाधव आदी उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, ग्राहकांच्या तक्रारीवर निर्णय होण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणण्यात आला आहे. या कायद्याविषयी अधिकाधिक नागरिकांपर्यंत माहिती पोहचविण्याची गरज आहे. ग्राहकांनी सतर्क राहून वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले.

श्री. झेंडे यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या तरतुदीविषयी माहिती दिली.

यावेळी शारदाबाई पवार विद्यालयाची विद्यार्थिनी भक्ती कराडे व भूमी कराडे, इंग्रजी माध्यम शाळा माळेगाव बु. येथील विद्यार्थी अनुज शहा यांनी विचार व्यक्त केले.

तहसीलदार श्री. शिंदे यांच्या हस्ते पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर सलग चौथ्यांदा निवड झाल्याबद्दल प्रमोद जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पात्र लाभार्थ्यांना योजनेच्या लाभ मंजुरीबाबत प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *