प्रतिनिधी – राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त एकता नैसर्गिक सेंद्रिय गट, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवार फेरी व रब्बी हंगामातील पिकांविषयी चर्चा व मार्गदर्शनाचा कार्यक्रम मळद येथे श्री अरविंद गायकवाड यांच्या शेतावरती घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये कृषी विज्ञान केंद्राने खरीप हंगाम 2023- 24 मध्ये तुर पिक (गोदावरी) व कृषी विभागातर्फे रब्बी हंगाम 2023-24 साठी शेतकऱ्यांना हरभरा पिक (फुले विक्रम) ऊस आंतरपीक साठी प्रात्यक्षिके प्लॉट दिले होते. या दोन्ही पिकांची मान्यवरांच्या उपस्थितीत पिक पाहणी (शिवार फेरी) व त्यानंतर मार्गदर्शनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग बारामती यांच्यामार्फत जनावरांसाठी विविध आजारांची औषधे शेतकऱ्यांना मोफत वाटण्यात आली. तसेच कृषी विभागातर्फे रब्बी हंगामातील हरभऱ्यासाठी व ज्वारीसाठी किड नियंत्रणासाठी ट्रॅप व औषधे वाटण्यात आली. या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ धीरज शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेष तज्ञ श्री संतोष करंजे, कृषी पर्यवेक्षक सौ मीरा राणे, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती चे सहाय्यक श्री मेजर गायकवाड, कृषी विज्ञान केंद्राचे सहाय्यक श्री पोपटराव गावडे इत्यादी उपस्थित होते. या सर्वांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकता शेतकरी समुहाचे अध्यक्ष श्री प्रशांत शेंडे व मान्यवरांचे स्वागत एकता नैसर्गिक सेंद्रिय गटाचे अध्यक्ष श्री नानासो गावडे, गटचे सचिव श्री मनीष हिंगणे, श्री वाघेश्वर गटाचे अध्यक्ष श्री दिगंबर मोहोळकर सर,श्री महादेवअण्णा गावडे,श्री अविनाश गावडे,श्री राजेंद्र गायकवाड,श्री लालासाहेब गावडे,श्री सुनील हिवरकर इत्यादींनी स्वागत केले कार्यक्रमाचे आभार कृषी सहाय्यक सौ मनीषा काजळे यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.