प्रतिनिधी – अनेकान्त एज्युकेशन सोसायटी बारामतीचे माजी अध्यक्ष व दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अरहतदास शहा सराफ यांचे दि. २० डिसेंबर २०२३ रोजी वृध्दापकाळामुळे दुःखद निधन झाले. संस्थेच्या स्थापनेपासून त्यांनी संस्थेसाठी काम केले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये संस्थेस धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झाला. संस्थेतील वेगवेगळी पदे त्यांनी भूषविली. अनेक वर्षे अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपदी काम केले. संस्था व महाविद्यालयाच्या हितासाठी ते सतत कार्यरत होते. बारामती व परिसरातील उद्योजक व सराफी व्यवसायामध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जात होते. अत्यंत सचोटीने व प्रामाणिकपणे त्यांनी सराफीचा व्यवसाय केला. ते स्पष्ट, परखड, वक्तशीर, प्रामाणिक व धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी आचार्य १०८ श्री शांतीसागरजी महाराज यांची अनेक वर्षे वय्यावृत्ती केली. अरहतकाकांना महाराजांचे आशिर्वाद मिळाले. गुरुसेवा करण्याची संधी मिळाली. त्यांच्या बागेत महाराजांच्या आठवणी त्यांनी जतन केल्या आहेत. अरहतकाकांच्या निधनाने संस्था, महाविद्यालय व दिगंबर जैन समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक गेल्यामुळे सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकान्त एज्युकेशन सोसायटी बारामतीचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर व सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, खजिनदार, सुनिल शहा लेंगरेकर, सर्व विश्वस्त, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, रजिस्ट्रार अभिनंदन शहा, उपप्राचार्य, प्राध्यापक, सर्व शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी दुःख व्यक्त केले.