नेत्र तपासणी शिबिरात 53 पत्रकारांची तपासणी

बारामती : ब्रेकिंग न्यूजच्या युगात सतत धडपडत काम करणाऱ्या पत्रकार बांधवांसाठी काल 20 ऑगस्ट रोजी मोफत डोळे तपासणी शिबीर आयोजित केले होते. रोजच्या घडामोडींवर लक्ष ठेवून काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचे सातत्याने मोबाईलवर किंवा कंम्प्युटरवर काम सुरु असते त्यामुळे डोळ्यांचा त्रास होतो, याच अनुषंगाने नियमित तपासणी करून डोळ्यांची काळजी घेणे कामी हे शिबीर आयोजित केले होते. बारामती शहरातील सुप्रसिद्ध डॉ राठी यांच्या प्रिझ्मा आय केअर या हॉस्पिटलमध्ये हे शिबिर संपन्न झाले.
या शिबिरात 53 पत्रकारांची नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन नामदेवराव शिंदे, पोलीस निरीक्षक यांनी केले, तर उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती, सांगता समारोप झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष मा. भगवानराव वैराट साहेब यांच्या शुभहस्ते झाला.
दरम्यान यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक शिंदे म्हणाले की समाज हिताच्या बातम्यांचा आढावा घेत असताना पत्रकार बांधवांनी स्वतः ची देखील काळजी घेतली पाहिजे. आपण समाजासाठी काम करत आहोत व आपले देखील कुटुंब आहे त्यांना देखील वेळ देऊन काम करत राहिले पाहिजे. सांगता समारोपावेळी वैराट साहेब म्हणाले की आजच्या परिस्थितीत पत्रकार बंधु महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. अन्यायाचा प्रतिकार करताना व लोकशाही चे रक्षण करताना स्वतः ची देखील प्रकृती सांभाळली पाहिजे. त्यासाठी सर्व पत्रकार बंधुनी एकत्र येत असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. यावेळी भगवानराव वैराट यांनी स्वतः देखील डोळे तपासणी करून शिबीराला शुभेच्छा दिल्या. दरम्यान उपस्थित पत्रकार बांधवाचे व प्रमुख पाहुण्यांचे आभार योगेश नालंदे यांनी मानले.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नानासाहेब साळवे, इंद्रभान लव्हे, गणेश जाधव, तसेच डॉ. हर्षल राठी, डॉ. अपर्णा राठी, श्री. दिपक कापसे, सौ. वनिता यादव, श्री. श्रीकांत शेंडगे, श्री. दादा राऊत, सौ. अश्विनी खोत, सौ. धनश्री कळसकर, सौ. सुजाता रणनवरे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *