तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा संपन्न

प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, पुणे व अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ मधील राज्यस्तर शालेय नेटबॉल स्पर्धा नुकतीच महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर व पुणे असे मुलांचे आठ व मुलींचे आठ विभागाचे असे एकूण १६ संघ आलेले होते.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुणे विभागाचे उपसंचालक अनिल चोरमले व पुणे जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, महाराष्ट्र अम्युचर नेटबॉल संघटनेचे सहसचिव श्याम देशमुख, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांचे हस्ते प्रथम तीन क्रमांक प्राप्त संघाना चषक, प्रमाणपत्र व मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले. या समारंभास उपप्राचार्य डॉ.अशोक काळंगे, डॉ.सचिन गाडेकर, रजिस्ट्रार अभिनंदन शहा, कनिष्ठ महाविद्यालयाचे को-ओर्डीनेटर संजय शेंडे उपस्थित होते. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे मुलांच्या गटात प्रथम क्रमांक तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती पुणे विभाग, द्वितीय क्रमांक नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, परभणी छत्रपती संभाजी नगर विभाग), तृतीय क्रमांक विद्याभारती महाविद्यालय, अमरावती अमरावती विभाग तर मुलींच्या गटात प्रथम क्रमांक तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती (पुणे विभाग), द्वितीय क्रमांक नूतन कन्या विद्यालय, भंडारा (नागपूर विभाग), तृतीय क्रमांक विद्याभारती महाविद्यालय, अमरावती (अमरावती विभाग)
संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर व सचिव मिलिंद शाह वाघोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अशोक देवकर यांनी केले तर डॉ.गौतम जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *