प्रतिनिधी – श्री संभाजी भिडे गुरुजी यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भर दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात येते. बारामतीत देखील घटस्थापना ते दसरा असे नियमित दुर्गामाता दौड आयोजन करण्यात येते. पहाटे ६ वाजता भिगवण चौक ते माळावरची देवी यामार्गे दौड होते तसेच बारामती तालुक्यात आजूबाजूच्या जवळपास १५ गावामध्ये देखील मोठ्या संख्येने दौड होते. दसऱ्या दिवशी तालुक्यातील सर्व एकत्रित गावाची दुर्गामाता दौड होते. यावेळी बारामती शहरातून फेरी होते भिगवण चौकातून देवीची आरती करून सुरवात होते पूर्ण शहरामध्ये दौडचे मोठ्या उस्ताहात महिला भगिनी औक्षण करुन स्वागत करतात. छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान कसबा येथे दौडचा समारोप होतो. अशी माहीती बारामती विभाग प्रमुख संग्रामसिंह जाचक यांनी दिली.
सत्ताकारण, अर्थकारण, राजकारण सर्वांना दुर ठेवुन डाव्या-उजव्या काळजात रक्ताच्या प्रत्येक थेंबात छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या आचाराची, विचाराची, कार्य- कर्तृत्वाची, निस्वार्थ भावनेने राष्ट्रसेवा करणारी तरुण पिढी निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे श्री दुर्गमाता दौड आहे असेही आयोजकांनी यावेळी सांगितले.