बारामती: महाराष्ट्र पोलीसांच्या सुरक्षततेसाठी मायबाप दयाळु सरकार ३००० बाउन्सर (कंत्राटी पुरक्षक) नेमणार आहेत. गृहमंत्री यांचा आपल्याच पोलीसांवर विश्वास नाही का? शासनाने बृहन्मुंबई पोलीसांच्या स्थापनेवर कत्राटी पोलीस मनुष्यबळ नेमण्याचा आदेश काढला आहे. हा आदेश कोणाच्या भल्यासाठी आणि कोणाचा विसा गरम करण्यासाठी काढला? शासनाला ३००० मनुष्य बळ हवे आहे. तर त्यासाठी भरतीची प्रक्रिया का राबविण्यार येत नाही. मुंबई सारखे अतिसंवेदनशील शहर कंत्राटी सुरक्षकांच्या हाती देण्यात कोणाचे शहाणपण आहे. पोलीस भरतीसाठी जीव रान करणारे युवक/युवती या शासनाला दिसत नाहीत का? त्यांचा हक्क का हिरावुन घेतला जात आहे. गृहमंत्री यांनी त्या महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर दिले पाहिजे. महाराष्ट्र राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या युवक/युवतींना पोलीस बनुन महाराष्ट्र राज्याची सेवा करावयाची आहे. या निर्णयामुळे त्यांच्या हाती निराशा लागली आहे. या सरकारला जर का इतकीच राज्याच्या सुरक्षिततेची काळजी आहे तर आपल्याकडे महाराष्ट्र होमगार्ड तरुण योध्दा तयार आहे. सुरक्षा रक्षक म्हणुन होमगार्ड यांना कायमस्वरूपी ३६५ दिवस रोजगारही उपलब्ध होईल आणि मोठया प्रमाणावर बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. अजुन किती असे निर्णय घेणार आहात ज्याने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा तरुण विद्यार्थी लहान मोठे उद्योग कंत्राटी पध्दती करून राज्या वाटोळे करणार आहात. मागच्या आठवडया मध्ये चक्क तहसिलदार कंत्राटी पध्दतीने भरती जाहिरात प्रसिध्द केली अजून किती वाट लावायची आहे आमची आणि आमच्या महाराष्ट्र राज्याची आणि आमच्या पुढव्या पिढीची आम्हाला सर्व खाजगीकरण करण् असेल तर आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांचे सर्व खाजगीकरण करण्यात यावे आगोदर शिक्षण विभाग, विद्यापीठ, रेल्वे, टेलिफोन दुरसंचार निगम, विमानतळ, राज्य विद्युत मंडळ असे एक नाही तर अनेक विभागांचा खाजगीकरण करण्याचा तसेच मिलीटरी हे सुध्दा अग्निवीर असे नामकारण करण्यात आले गृहमंत्री यांनी तात्काळ हा निर्णय खुद करावा व नविन पोलीस भरती किंवा होमगार्ड यांना ३६५ दिवस सेवा करण्याचा अधिकार दयावा अन्यथा महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन राज्यभर तीव्र आंदोलन करेल याची गंभीर दखल घ्यावी असा इशारा यावेळी देण्यात आला.पोलीस बॉईज असोसिएशन संघटनेचे वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी
संजय( नाना) दराडे, शितल शहा, अँड मेघराज नालंदे, अँड ओंकार इंगुले, पत्रकार माधव झगडे, अमोल बिनवडे, शैलेश सोनवणे, अनिकेत वनवे, अमोल गायकवाड, विनीत किर्वे, वैभव ननवरे, बाळासाहेब डोळस, राहुल रासकर, गणेश बडे, सचिन कांबळे ,कल्याण मोहिते, हरीश खंडागळे इत्यादी बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते