कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीने दिला बारामती बंदचा इशारा..

बारामती- आज बारामती येथे बारामती नगर परिषद मध्ये एन डी के या ठेकेदाराकडे सफाई काम करणाऱ्या कंत्राटी कामगार उषा भोसले यांच्या काल काम करत असताना अपघात होऊन त्या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्या वर उपचार चालू आहे परंतु त्यांना ऍडमिट करत असताना असे समोर आले कि या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हेल्थ इन्शुरन्स काढले जात नाहीत, त्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार वेळेवर दिला जात नाही त्यांचा पीएफ भरला जात नाही त्यांना सेफ्टी किट दिल जात नाही त्यांना आरोग्य सुविधा दिल्या जात नाहीत त्यामुळे अशा प्रकारचे अपघात झाल्यानंतर उपचार करण्यासाठी त्यांच्यावर आर्थिक संकट येते त्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या सर्व सुविधा मिळाव्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी बारामती नगरपरिषद यांना या कंत्राटी किमान वेतन प्रमाणे पगार वेळेवरती करावा तसेच हेल्थ इन्शुरन्स काढावेत त्यांचा पीएफ वेळेवरती भरावा सेफ्टी गेट देण्यात यावे त्यांना आरोग्य सुविधा देण्यात यावे रस्त्यावरती काम करत असताना त्यांच्या सेफ्टी साठी उपाययोजना राबवण्यात याव्यात अशा प्रकारचे निवेदन पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आले या वेळी निकाळजे यांनी वरील सर्व मागण्या वर जर येत्या सात दिवसांमध्ये नगर पालिकेने निर्णय घेतला नाही किंवा तशा प्रकारच्या उपाय योजना राबवल्या नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून बारामती बंदचा इशारा दिला यावेळी तालुका अध्यक्ष रामदास जगताप, तालुका संघटक आनंद जाधव, शहर उपाध्यक्ष जितेंद्र कवडे, शहर सचिव विनय दामोदरे, प्रबुद्ध नगर शाखा अध्यक्ष आदेश निकाळजे, शाखा उपाध्यक्ष बंदी डिकळे, बंटी सोनवणे कृष्णा साळुंके व कंत्राटी काम करणाऱ्या बहुसंख्या महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *