बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज बारामती या विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी जवळजवळ 2000 विद्यार्थी व शिक्षक यांनी एकाचवेळी वाचन केले.हे सर्व विद्यार्थी पुस्तकाच्या आकारात मैदानावर बसून वाचन केले.या दिनाच्या निमित्ताने विद्यालयाचे प्राचार्य श्री पी.पी.मोरे यांनी डॉ.कलाम यांचे जीवनचरित्र या विषयावर मार्गदर्शन केले.त्यांची संशोधक म्हणून असणारी कामगिरी सरांनी स्पष्ट केली.तसेच 21 व्या शतकात मोबाईल च्या युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे.तरी स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सर्वांनी नियमित वाचन वाढवावे असे प्रतिपादन त्यांनी केले.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री निवास सणस यांनी वाचनाचे महत्व स्पष्ट केले.वाचनाने मनुष्याच्या ज्ञानात खूप मोठी भर पडत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री मोरे पी.पी.,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे,पर्यवेक्षक श्री निवास सणस,ग्रंथपाल श्री संजय निगडे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.