टेक्निकल मध्ये आपत्ती व्यवस्थापन दिनानिमित्त बारामती नगरपालिका यांच्यातर्फे अग्निशमन ची प्रात्यक्षिक सादर

प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयात आंतरराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दिन विविध प्रात्यक्षिक सादर करून साजरा करण्यात आला. बारामती नगर परिषदेचे अग्निशमन दलाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.सर्वप्रथम फायरमन प्रदीप लालबिगे यांनी आपत्ती चे विविध प्रकार स्पष्ट करत आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.यावेळी यांनी आग लागल्यानंतर ती कशी विझवली याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यासाठी फायरमन प्रदीप लालबिगे फायरमन अक्षय माने व निवृत्ती जाधव यांनी आग कशाप्रकारे विझवली जाते ,याचे प्रात्यक्षिक दाखवले .तसेच अग्निशमन गाडीच्या साहाय्याने आगीवर पाणी कसे फवारले जाते याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.मुलांनी सुद्धा प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला. विद्यालयातील जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला. आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन विद्यालयाचे प्राचार्य मोरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गायकवाड सर यांनी केले, तर आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सणस सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *