यावर्षीचे शिवशंभू सन्मान चिन्ह २०२३ आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना सुपूर्त.!!

पुणे | गेल्या ३ वर्षापासून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभरात सामाजिक कार्यात काम करत असलेल्या लोकांना शिवशंभू सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येत आहे आहे अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांनी दिली. श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीचा २०१८ साली इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथून चालू झालेला प्रवास महाराष्ट्रातील इंदापूर, बारामती, भिगवण, अकलूज, सोलापूर, करमाळा, अहमदनगर, शिर्डी, मुंबई, बीड, या सर्व जिल्ह्यातून अजूनही रक्तदानाच्या माध्यमातून चालू आहे. आजपर्यंत महाराष्ट्रभर ३५ ब्लड बँकेसोबत श्री शिवशंभु ट्रस्ट काम करत असून गेली ४.५ वर्षात ६०,००० पेक्षा जास्त रक्तदात्यांची चळवळ उभी करुन ७०० पेक्षा जास्त रक्तदान शिबिर आयोजित करून १२०० पेक्षा जास्त रक्ताच्या बॅग मोफत (क्रॉस मॅचिंगच्या फी) मधे देण्यात आल्या आहेत. अशी माहिती शिवशंभू ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुर्वे यांनी दिली.

वर्ष पहिले:- म्हणजेच २०२१ यावर्षी इंदापूर तालुक्यातील माझी सैनिक संघ, वालचंदनगर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या
टीमला प्रथम शिवशंभू सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले होते.

वर्ष दुसरे:- म्हणजेच २०२२ वर्षी इंदापूर तालुक्यातील हॉस्पिटल, तसेक सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, इंदापूर नगरपालिकेतील सफाई कामगार या सर्वांना शिवशंभू सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले होते.

वर्ष तिसरे:- म्हणजेच २०२३ यावर्षी सामाजिक कार्यात हॉस्पिटल आणि आरोग्य क्षेत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सावली, साहेबांची ढाल, आरोग्य कवच, आरोग्यदूत मा. श्री. मंगेश चिवटे साहेबांना भिगवण येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयात शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे, मनोज आण्णा राक्षे, विशाल धुमाळ, सुरज पुजारी, संजुभाऊ बंडगर, विशाल बंडगर, अक्षय सोलंखे, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शिवशंभू सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री वैदयकीय सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे ते विशेष कार्याधिकारी आहेत, चिवटे साहेबांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून एका वर्षात १२५ कोटींच्या पेक्षा जास्त निधी वितरित करुन महाराष्ट्रामध्ये नवीन विक्रम प्रथापित केला आहे म्हणून यावर्षीचा शिवसंभू सन्मान २०२३ मंगेशजी चिवटे यांना देण्यात आल्याचे ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष भूषण सुर्वे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *