महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्स असोसिएशन आयोजित राज्यस्तर मैदानी स्पर्धा नुकत्याच डेरवण नाशिक या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाची थाळी फेक खेळाडू भक्ती गावडे व ४०० मी. धावपटू आकांक्षा घाडगे या दोन खेळाडूंची पुणे जिल्हा संघात निवड होऊन राज्यस्तर मैदानी स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत भक्ती गावडे हिने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. तसेच आकांक्षा घाडगे हिने ४ x ४०० मी. रिले स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या राज्यभर स्पर्धेतून भक्ती गावडे हिची तामिळनाडू या ठिकाणी होणा-या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. भक्ती गावडे या पूर्वी देखील असोसिएशनच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेली आहे. तसेच मागील वर्षी झालेल्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत देखील सहभागी झाली होती. जिद्द व चिकाटी, सरावातील सातत्य यामुळे भक्ती ने हे यश मिळविलेले आहे. या खेळाडूंना डॉ.गौतम जाधव व प्रा.अशोक देवकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, सर्व उपप्राचार्य, रजिस्ट्रार, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी भक्ती गावडे हिचे अभिनंदन केले आहे.