ॲक्टिव्ह किड्स इंटरनॅशनल स्कूलला टॅलेंट नॅशनल अवॉर्ड पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी – टॅलेंट फाऊंडेशन पुणे अध्यक्ष दिपक जाधव व सहकारी यांच्या वतीने कला, शैक्षणिक, बँकिंग, क्रीडा सामजिक अशा विविध क्षेत्रात उकृष्ट कामगिरी करणाऱ्या नामवंत व्यक्तीस, संस्थाना व सामाजिक संघटना यांना टॅलेंट नॅशनल अवॉर्ड 2023 या पुरस्काराने नुकतेच पुणे येथे गौरविण्यात आले, यामध्ये आपल्या ॲक्टिव्ह किड्स इंटरनॅशनल स्कूल या संस्थेला टॅलेंट नॅशनल अवॉर्ड 2023 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला,
पुरस्कार वितरण प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते श्री.सुनिल गोडबोले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, श्री. मेघराज राजेभोसले, अभिनेत्री कु.आर्या घारे यांच्या शुभ हस्ते पत्रकार भवन पुणे येथे प्रदान करण्यात आला, प्री स्कूल म्हणून केलेली सुरुवात बघता बघता १३ वर्षे झाली. मुलांना दिलेले दर्जेदार शिक्षण विचारात घेता, मुलांना अजूनही चांगले शिक्षण देता यावे यासाठी कटिबध्द असलेला शिक्षक स्टाफ, व मुलांचे भविष्यातील हित डोळ्यासमोर ठेवीत, स्कूल कार्यरत आहे, संस्थेची वाटचाल यशस्वी व प्रगतीपथावर ठेवली आहे,
समाजातील ग्रामीण व शहरी भागातील मुलांना विविध मार्गदर्शन, प्रशिक्षण घेणे आणि खेळ व विविध स्पर्धा आयोजीत करणे, मुलांचा सर्वांगीण विकास व सक्षमीकरणासाठी स्कूलचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार ज्येष्ठ अभिनेते मेघराज राजेभोसले यांनी काढले, मी आपले सर्व कार्यक्रम व्हॉटसअप द्वारे पाहत असतो असे सांगितले. यावेळी स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. शुभांगी बनकर यांना सुनील गोडबोले व आर्या घारे यांनी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या.

      याप्रसंगी राहुल बनकर, प्रमोद भोसले, शेलार सर आदी उपस्थित होते. स्कूलचे स्टाफ सौ करिष्मा पवार, सोमय्या शेख, सौ. रेवती पाटील, कुमारी आफ्रिन बागवान, सौ.कीर्ती सुतार, सौ.मीनाक्षी गोसावी सौ. सारिका पाटील,सौ. मेघा जगदाळे,सौ. शितल खर्चे, देवर्षी बागडे, सौ कीर्ती जावळे, सौ.मनीषा शिंदे, सौ. स्वप्नाली कापरे, सौ.वृंदा काशीद, सौ. रूपाली मुळीक तेजस्विनी वेदपाठक, गौरी अवघडे, ज्योती सोनवणे, सौ.भोसले मिस, श्री शुभम इंगवले, सौ. शोभा कांबळे. सौ.अंजना मासाळ,सौ रिता घोरपडे व सर्व पालक वर्ग या सर्वांच्या सहकार्य प्रयत्न मार्गदर्शनामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. स्कूल अल्पावधीतच उदिष्टपूर्ती कडे यशस्वी वाटचाल करीत आहे, संस्थेचे विश्वस्त श्री. राहुल बनकर व प्राचार्य सौ. शुभांगी बनकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे, सर्व पालक मुले, हितचिंतक यांच्या सार्थ विश्वासावर स्कूल उत्तोरउत्तर यशस्वी वाटचाल व प्रगती करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *