वंचित बहुजन आघाडीच्या तीन शाखांचे उद्घाटन संपन्न

बारामती – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रदेशाध्यक्ष रेखाबाई ठाकूर यांच्या आदेशाने तसेच प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या संकल्पनेतून गाव तिथे शाखा अभियान पूर्ण जिल्ह्यात मध्ये सुरु आहे त्याच अनुषंगाने बारामती येथील प्रबुद्ध नगर, दादासो नगर व बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर या महत्वाच्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष राज यशवंत कुमार साहेब यांच्या हस्ते शाखाचे उदघाट्न मोठ्या दिमाखात करण्यात आले. बारामती येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्मारकास अभिवादन करून हलगीच्या तालात प्रबुद्ध नगर एरियामध्ये रॅली काढत तेथील शाखेचे उद्घाटन करून दादासो नगर या दिशेने रॅली काढून दादासो नगर या ठिकाणच्या शाखेचे उद्घाटन करून बऱ्हाणपूर या ठिकाणचे शाखा उद्घाटन करण्यात आले यावेळी मनोगत व्यक्ती करत असताना जिल्हाध्यक्ष राज कुमार यांनी देशामध्ये सुरु असलेल्या अन्याय अत्याचार, चुकीच्या पद्धतीच्या राजकारणमुळे व हलगर्जी पणामुळे नांदेड येथील 31 नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि हे झालेला असताना देखील महाराष्ट्रातील राजकारण यांनी पालकमंत्री पदे जाहीर करून आपल्या मंत्रिपदाचा जल्लोष साजरा केला त्यामुळे या नेत्यांना येथील नागरिकांचे काही घेणं देणं नाही लोक आपल्या मंत्रिपदामध्येच दंग आहेत परंतु येथील नागरिकांची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत त्यामुळे अशा नेत्यांना घरी बसवलं पाहिजे अशाप्रकारचे वक्तव्य केले तसेच जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी महाराष्ट्र सरकारने शाळा दत्तकच्या निर्णयावरती तसेच कंत्राटीकरणाच्या निर्णयावरती नाराजी व्यक्त केली व हे सरकार बदलून वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणा अशे आव्हान केले व शाखा पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हा उपाध्यक्ष सतीश साळवे, तालुका अध्यक्ष रामदास जगताप, बारामती शहर अध्यक्ष ऍड. रियाज खान यांनी शाखा पदाधिकारी यांना कामाची पद्धत सांगून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे आवाहन करून शाखा अध्यक्ष सुमित सोनवणे, आदेश निकाळजे, मयूर मोरे व त्यांच्या सोबतच्या सर्व पदाधिकारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा सहसचिव गोविंदा कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख ऍड वैभव कांबळे, तालुका सचिव प्रतीक चव्हाण, तालुका संघटक आनंद जाधव, अशोक कुचेकर, गणेश थोरात, शहर उपाध्यक्ष जितेंद्र कवडे, शहर महासचिव कृष्णा साळूंके, शहर सचिव विनय दामोदरे, मोहन कांबळे, मालेगाव शहर अध्यक्ष आण्णा घोडके, सम्यक बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले, किशोर मोरे, निरावागज शाखा अध्यक्ष प्रियांका देवकाते, सिद्धांत सावंत, अखिल बागवान, चैतन्य साबळे शिल्पा यशवदे, ज्योती पोळके, पूजा मोरे, निलम निकाळजे आदी पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *