बारामती (प्रतिनिधी, गणेश तावरे ) महाराष्ट्र शासनाने पोलीस वाहन चालक पदाच्या परीक्षा घेण्याचे ठरवले असून परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस वाहन चालक पदांमध्ये सेवा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जवळजवळ अकरा हजारांहून अधिक वाहन चालक भरती करण्यात येणार आहे. या भरतीच्या अनुषंगाने बारामती येथील सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती यांनी पोलीस वाहन चालक पदाच्या परीक्षेसाठी मोफत कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना मा श्री खोमणे मार्गदर्शन करत असताना त्यांनी पोलीस चालक वाहन या पदाच्या माध्यमातून मुलांबरोबर मुलींनाही संधी मिळणार आहे. त्यांचा आरक्षित कोटा हा त्यांना मिळणारच आहे. आज पर्यंत विमान असेल, रेल्वे असेल बस अशा मध्ये महिलांना संधी देण्याचं सरकारचं धोरण आहे. त्याचा फायदा मुलींना होत आहे. मुलांच्या बाबतीत त्यांनाही ही एक सुवर्णसंधी आली आहे. त्यासाठी पोलीस वाहन चालक पदाची परीक्षा देताना वाहन चालवताना जे नियम परिवहन खात्याने दिले आहेत त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी मी या विषयी तज्ञांनी पुस्तक लिहिली आहेत ती पुस्तके आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ असे खोमणे साहेब यांनी यावेळी सांगितले. वाहन कायदा मोटार अधिनियम याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली, सिग्नल असतील तसेच ट्रॅफिकचे नियम आणि वाहन चालवताना जे नियम परिवहन खात्याने घालून दिलेले आहेत, त्या सर्व नियमाचे अटीचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना केले. जवळजवळ बारा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी पोलीस वाहन पदाच्या जागेसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यातून 11 हजार विद्यार्थ्यांना सेवेमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी अभ्यासा बरोबर वाहन चालवताना जे नियम आहेत ते नियम आपण लक्षात घेतले तरी आपण या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करू शकाल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि त्यांनी विद्यार्थ्यांना पोलीस वाहन चालक भरतीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सह्याद्री करिअर अकॅडमी चे उमेजी रुपनवर, सामाजिक कार्यकर्ते सुनील देवकाते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा श्री भांगे सर यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.