प्रतिनिधी – बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय या ठिकाणी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे जेष्ठ प्रा. विकास काकडे यांचे संख्या शास्त्र व करिअर या विषयी बाह्य मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.यामध्ये इ 5 वी ते 10 च्या विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यक्रमाची सुरुवात गुरुकुल प्रमुख श्री अरविंद मोहिते यांनी प्रस्ताविकेतून केली. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री निवास सणस यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रा.काकडे यांनी संख्याशास्त्र या विषयामध्ये करिअरच्या अनेक संधी असल्याचे विविध उदाहरणांवरून विद्यार्थांना स्पष्ट करून सांगितले.संख्याशास्त्र या एकाच विषयासाठी शासनाचा अर्थ व सांख्यिकी विभाग असल्याचे सांगत या विभागामध्ये करिअर च्या अनेक संधी असून विद्यार्थांनी पारंपरिक विषयापेक्षा या विषयांकडे विद्यार्थांनी वळले पाहिजे.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री मोरे पी.पी.उपमुख्याध्यापक श्री देवडे के.डी. पर्यवेक्षक श्री निवास सणस ,व इतर सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.