बारामती, दि. ५: कृषी विभाग व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रब्बी हंगाम प्रशिक्षण कार्यशाळेअंतर्गत ‘कृषी मालांचे विपणन व भविष्यातील संधी’ या विषयावर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे चर्चासत्र संपन्न झाले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायदार संघाचे खजिनदार सुनील पवार, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वासराव आटोळे, सतिश जगताप, सचिव अरविंद जगताप, मंडळ कृषि अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते
या चर्चासत्रात तालुक्यातील पीक पद्धती, प्रमुख पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढ, विपणन व्यवस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील उपलब्ध पायाभूत सुविधांचा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत भविष्यातील नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली.
रबी हंगाम प्रमुख पिकांचे लागवड तंत्रज्ञान, करडई, एरंडी या पिकांची क्षेत्रे वाढ व डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनबाबत क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले