बारामती, दि.४: तालुक्यातील निदानापासून वंचित असलेल्या क्षयरुग्णांचा गृहभेटीद्वारे शोध घेण्यासाठी क्षयरोग शोध मोहिमेचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेंतर्गत १३ ऑक्टोबरपर्यंत घरोघरी भेट देत आरोग्य कर्मचारी क्षयरुग्णांचा शोध घेणार आहेत.
यावेळी विस्तार अधिकारी सुनील जगताप, डॉ. हेमंत नाझीरकर पर्यवेक्षक महादेव मोहिते, शशिकांत येळे, पर्यवेक्षिका स्वाती ननवरे, आरोग्य पर्यवेक्षिका जयश्री उरसळ, गटप्रवर्तक लक्ष्मीप्रभा करे, आशा स्वयंसेविका व कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचे रोगनिदान व रोगावरील औषधोपचार शासकीय रुग्णालयात मोफत करण्यात येते. या सुविधेचा तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. खोमणे यांनी केले आहे.