अजीज भैय्या शेख मित्र परिवार यांच्या वतीने भव्य कॅरम स्पर्धा संपन्न

बारामती : अजीज भैय्या शेख मित्र परिवार यांच्या विद्यमाने बारामती येथे दोन दिवसीय भव्य आशा कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उदघाटन ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक मा.सुधीर नाना सोनवणे मा नगरसेवक बा.न.प. यांच्या हस्ते पार पडले.यावेळी प्रमुख पाहुणे तैनुर भाई शेख, सुजित जाधव आणि आयोजक विशाल सोनवणे यांच्या उपस्थितित करण्यात आले. या स्पर्धेसाठी राज्यातील व राज्याबाहेरील स्पर्धक सहभाग घेतला असुन यामध्ये तेलंगणा,मुंबई, पुणे,सोलापूर, अकलूज, करमाळा,फलटण आणि बारामती येथून खेळाडूनीं सहभाग नोंदवला आहे.
या कॅरम स्पर्धेचा अंतिम दिवस मंगळवार दि ३/१०/२०२३ रोजी फायनल चा दिवस असल्याने पुर्ण दिवस झालेल्या स्पर्धाता रंगत वाढल्याने हा खेळ वेळेच्या दोन तास उशीर पर्यन्त चालला असुन अनेक कॅरम प्रेमीनी उत्साहाने फायनल पहायला गर्दी केली होती.सदर स्पर्धे मध्ये एकुण ६४ स्पर्धकांनी भाग घेतला होता.त्यामधील काही स्पर्धकात फायनल खेळवण्यात आल्याने यामध्ये एकुण आठ जण स्पर्धकांनी बाजी मारली. त्या मध्ये प्रथम क्रमांक- विकी आणा. पुणे, दुसरा क्रमांक – इम्तियाज हुजरे पुणे, तिसरा क्रमांक – नकुल काकडे पुणे,चौथा क्रमांक- बापू साळूंके अकलूज, पाचवा क्रमांक – भोला सोनवणे बारामती, साहवा क्रमांक – जयकुमार हैदराबाद, सातवा क्रमांक – रहीम खान पुणे, आठवा क्रमांक – आमिर बागवान बारामती आशा या स्पर्धकांनी पारितोषिक पटकवली सदर बक्षिस
त्या सर्वांचे अभिनंदन व ज्या सर्व स्पर्धकांनी भाग घेतला होता त्या सर्वांचे सुद्धा सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन व अभार मानण्यात आले.या कॅरम स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरण मध्ये पार पडल्या अजीज भैय्या शेख मित्र परिवार यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅरम स्पर्धा यशस्वी पार पडण्याकामी आयोजक विशाल सोनवणे, समीर बागवान, भोला सोनवणे, विकास वाडीले, राहुल साबळे, सचिन अहिवळे यांनी मोलाचे परिश्रम घेतले व इतर सहकारी यांच्या कडून सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *