मुस्लिम युवकांनी दिला डिजे मुक्तचा नारा
बारामती : दि.१ ऑक्टोंबर रोजी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद- ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धोरणेनुसार अल्लाहने त्यांच्या मार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना नबी, रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते. इस्लाममध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वांत मोठा दिवस असल्याचे मानले जाते. या सणाला ‘ईदों की ईद’ असेही म्हटले जाते.यावर्षी डिजे मुक्त जयंती साजरी झाल्याने सर्व स्तरातुन मुस्लिम समाजाचे कौतुक होत आहे. तर येथुन पुढे डिजे मु्क्त अशीच जयंती होईल अस ही जलसा कमिटी कडुन सांगण्यात आले.
ईद-ए-मिलाद यानिमित्त जुलुस मधुन सर्वत्र सुख-शांती टिकून राहावी, यासाठी प्रार्थना करण्यात येते. प्रेषित पैगंबर यांनी दिलेला मानवतेचा आणि शांततेचा संदेश सर्वत्र पोहचविण्या साठी ईद-ए-मिलाद या दिवशी नात, सलाम, नमाज व दुआपठण, कुराणवाचन असे धार्मिक विधी होतात. ईद-ए- मिलाद पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. शहरातील जामा मस्जिद येथून मिरवणूक अर्थात, जुलूस काढण्यात येतो. या भव्य जुलूसमध्ये धर्मगुरू मौलाना, मुस्लिमबांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. घोडे, उंट वर बसुन झेंड घेऊन मदिना शरीफ चे रोषणाईचा देखावा घेऊन त्यात घोषणा दिल्या जातात. सामाजिक संदेश दिले जातात.
स्वातंत्र्य सेनानी, नगरभूषण, सत्कार महर्षि क्रांती मैदान भाई गुलामअली सामाजिक संस्था व मरहूम सलीम भाई शेख मित्र परीवार कडुन गेली २७ वर्ष गुनवडी चौक येथे आदर युक्त नियमाचे पालन करुन जुलुसमधील सहभागी अनुयायी यांना केक, बिस्किटचे वाटप करण्यात येते यावेळी प्रमुख उपस्थिति बारामती आम मुस्लिम जमात अध्यक्ष हाजी जब्बार पठाण,मा.नगराध्यक्ष सुनिल पोटे,सुभाष सोमाणी, अॅड. रमेश कोकरे, मा.नगरसेवक सुनिल सस्ते,निलेश इंगुले,अमजद बागवाण,परवेझ सय्यद,अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे ,पोलीस निरिक्षक दिनेश तायडे,बिट्टू कोकरे,स्वातंत्र सैनिक उत्तराधिकारी संघटना अध्यक्ष निलेश कोठारी,राष्ट्रवादीचे शब्बीर शेख,गणेश जोजारे,काँग्रेचे रोहित बनकर,हरुण बाबा शेख,पत्रकार संतोष जाधव,राजु कांबळे,सिकंदर शेख इतर मान्यवर उपस्थित होते.
शहरातील कसबा येथे जुलुसचे भव्य स्वागत हे कसबा यंग सर्कल, गरिब नवाज फ्रेंड्स सर्कल, मलिक फ्रेंड्स सर्कल, सल्तनते ए उस्मानिया यंग सर्कल, ग्रीन स्टार ग्रुप,अलिशान फ्रेंड्स सर्कल, कडुन केक, बिस्किट, टोपी, मखनी, वाटप करुन पुल यथे हसन नाना ट्रस्ट,मुजावर वाडा यंग सर्कल, हुसेनभाई व अल्ताफभाई मित्र परिवार गुनवडी चौक येथे मुस्लिम यंग सर्कल, टिपु सुलतान प्रतिष्ठान, सर्वधर्म समभाव समिती, सुलतान ग्रुप, फुल अॅण्ड फाइनल ग्रुप व फरहान मुन्ना मित्र परिवार या सर्वाकडुन यामध्ये मिठाई, खाऊ, नानकटिई, केक, पाणी बोटल, शालेय साहित्य वाटप करण्यात आली तसेच पुढे शिकिलकर मित्र परिवार स्वागत करित गांधी चौक येथे बागवाण बाॅयज कडुन स्वागत करुन भिगवण चौक, इंदापुर चौक येथुन जुलुसची सांगात ही जामे मस्जिद आवारात प्रार्थना व दुआ करुन करण्यात आली.यावेळी पोलीस प्रशासनानी उत्तमरित्या जबाबदारी पार पाडल्या बद्दल आभार मानण्यात आले.