उद्योजक निलेश निकम यांच्याकडून ८ यंत्रे अधिकाऱ्यांकडे सुपुर्द
माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) दि.२५ माळेगाव (ता.बारामती) येथील पोलीस ठाण्याला अनंत-आशा इंटरप्रायजेस कंपनीकडून ८ अग्निशमन यंत्रे (Fire Extinguisher)भेट देण्यात आले. कंपनीचे मालक,शासकीय अग्नीसुरक्षा परीक्षक तथा माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी उद्योजक निलेश यांनी माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किरण अवचर सो.,पो.कॉ. अमोल वाघमारे, पो.कॉ.अमोल राऊत सह पोलीस स्टाफ यांच्याकडे सुपूर्द केले.
शासकीय कार्यालयांमध्ये विद्युत उपकरणे, संगणक प्रणाली आदींमुळे शॉर्टसर्किट तसेच इतर कारणास्तव अपघाती आग लागल्यास या अग्निशमन यंत्रांमुळे ही आग तात्काळ आटोक्यात आणता येते आणि शासकीय कागदपत्रांचे आणि स्वतःचे व इतरांचे आगीपासून संरक्षण करता येते. प्रत्येक शासकीय कार्यालयात अग्निशमन यंत्रणा असावी आणि ती प्रत्येकवेळी अपडेट केली जावी, त्यातील गॅस रिफिलिंग असेच अन्य बाबींवर लक्ष देण्यात यावे’ असे शासनाचे निर्देश आहेत मात्र अनेक कार्यालयात ही यंत्रे दिसत नाहीत.त्यामुळे अपघाताने लागलेल्या आगीचा धोका टाळता येणे शक्य होत नाही.त्यामुळे हीच बाब लक्षात घेऊन अनंत-आशा इंटरप्रायजेसचे निलेश निकम यांनी ही यंत्रे पोलीस ठाण्याला भेट दिली आहेत.आकस्मित आग लागल्यास ही यंत्रे कशी हाताळावीत? याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना व पोलीस स्टाफला मार्गदर्शन केले.ही यंत्रे भेट दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक किरण अवचर सो. यांनी निकम यांचे आभार मानले.
‘अग्निशमन यंत्रांमुळे शासकीय कार्यालयांत लागलेल्या आगीमुळे होणाऱ्या अपघातांपासून स्व-संरक्षण आणि महत्वाच्या वस्तुंचे नुकसान टाळता येणार आहे.कर्जतच्या सर्व शासकीय कार्यालयांसह आता माळेगावच्या पोलीस ठाण्यालाही सुरक्षित ठेवण्याचे काम हे अग्निशमन यंत्र करतील.