गोजुबावी अंतर्गत सावंतवाडी अंगणवाडी केंद्रामध्ये राष्ट्रीय पोषण माह अभियान साजरा

माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे) – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प बारामती-2 बिट शिर्सुफळ 2 अंतर्गत बुधवार दिनांक 20/9/2023 रोजी ग्रामपंचायत गोजुबावी अंतर्गत सावंतवाडी अंगणवाडी केंद्रामध्ये ” राष्ट्रीय पोषण माह अभियान ” कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी व विविध उपक्रमांची जनजागृती करणेकामी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते..
सदर ” राष्ट्रीय पोषण माह ” कार्यक्रमाचे उदघाटन मा.श्री.अभिमान माने बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती बारामती यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी मा.श्री डी.ए.नवले सहा.बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती बारामती, मा.सौ.राजश्री सावंत केंद्र प्रमुख पंचायत समिती बारामती, श्रीम.सुप्रिया माकर पर्यवेक्षिका बीट शिर्सुफळ-1 व 2 , आदीं मान्यवर उपस्थित होते तसेच माता – पालक , शिर्सुफळ बिट मधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस, सावंतवाडी गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते…
तसेच सदर ” राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर 2023 ” जनजागृती कार्यक्रमा मध्ये पोषण आहाराचे पाककृती व प्रात्यक्षिकाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते आहार प्रात्यक्षिकेा याबाबत जनजागृती करण्यात आली तसेच समाजामध्ये आरोग्य व पोषण विषयक जागृती निर्माण करणे ,पोषण विषयक सुधारणा करणे व संवेदनशीलता वाढविणे , शरीर निरोगी ठेवण्यासाठी भरडधान्य उपयुक्त, आहार मध्ये जारी ,बाजरी , नाचणी यामध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते , आहाराची पध्दत चुकीची असलयास वेगवेगळ्या व्याधी / आजार निर्माण होतात आदींबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती व उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले …
या कार्यक्रमाला आंगणवडी सावंतवाडी केंद्रातील सेविका समिंद्रा सावंत , मदतनीस अंजना जाधव व शिर्सूफळ 2 बिट मधील सर्व अंगणवाडी सेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *