साखरवाडीत आयोजित मिटींग ला व्यापारी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी – आपली साखरवाडी समृद्ध साखरवाडी या ब्रीद वाक्य खाली के टाईम्स मिडिया साखरवाडी च्या वतीने व्यापारी- उद्योजकांसाठी ऑनलाइनच्या जमान्यात स्थानिक दुकानदाराकडेच खरेदी करण्यासाठी अनोखा उपक्रम मिटिंग शनिवार दिनांक १६/०९/२०२३ रोजी वर्धमान मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. आपल्या व्यवसायामध्ये या अत्याधुनिक युगात डिजिटल माध्यमांचा कसा उपयोग होऊ शकतो व कसा बदल करू शकतो यावर चर्चा झाली. आपल्या व्यापाराला आपल्या उद्योगांना के टाईम्स च्या माध्यमातून नक्कीच नवी दिशा मिळेल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर के.टाईम्स मिडिया चे वेबसाईट बिझनेस एप्लीकेशन याचीही तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहीती के.टाईम्स मिडिया चे संस्थापक सुधीर नेमाणे यांनी दिली. तसेच के टाईम्स च्या नविन उपक्रमामुळे साखरवाडीच्या बाजारपेठेतील व्यापाराला पुन्हा जुने दिवस येतील किंबहूना त्याहून अधिक चांगले दिवस येतील असा विश्वास सुधीर नेमाणे यांनी व्यक्त केला. यावेळी नितिन इलेक्ट्रॉनिक्सचे श्री. रणवरे भाऊ, पिंकी गारमेंट चे भूषणशेठ गांधी, होलसेल किराणामाल व्यापारी स्वप्निल शेठ शहा, होलसेल किराणामाल व्यापारी बापूराव जाधव, शिवशंकर सॉ मिल चे शांतीलालशेठ पटेल, लंभाते हार्डवेअर चे ज्ञानेश्वर शेठ लंभाते, रावळ हार्डवेअरचे एम.जे. रावळ, ऑटोमोबाईल्स स्पेअर पार्ट विक्रेते भारतशेठ व्होरा, प्रगतशील बागायतदार संभाजी राजे जाधव, होलसेल इलेक्ट्रिकल्स प्रकाश शेठ महामुनी, विघ्नहर्ता बाजार चे सचिनशेठ चव्हाण, पत्रकार बंधू युवा जनमतचे उपसंपादक किसनराव भोसले आणि पुढारी चे पत्रकार , फलटण चौफेरचे संपादक श्री. गणेश पवार,पूजा ड्रेसेस चे तातू भोसले यांचे चिरंजीव, साक्षी मोबाईलचे आमचे बंधू संदीप नेमाणे, आमचे के टाईम्स चे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह जितू बोधे, सुप्रभात अमृततुल्य चे विष्णू गायकवाड, शिवार्थ स्नॅक सेंटरचे निखिल वाणी, राजदीप ऑटोमोबाईल्स चे राजू वाणी यांचे चिरंजीव शिवम वाणी, श्री.वारे सर, ओम वाणी, लल्लू जाधव तसेच व्यापारी-नव उद्योजक आणि पत्रकार बंधू हजर होते. पत्रकार किसनराव भोसले यांनी आभार प्रदर्शन केले