बारामती, दि. १७: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी अवयवदान अभियानाच्या समन्वयक अधिकारी डॉ. प्रज्ञा भालेराव, समन्वयक अधीक्षक डॉ. तुषार सावरकर, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका बुनगे, भूलतज्ज्ञ डॉ.अनघा लोंढे आदी उपस्थितीत होते.
डॉ.लोंढे यांनी अवयव दान, अवयव प्रत्यारोपण, अवयवदानाचे प्रकार, मेंदूची मृतावस्था, ग्रीन कॉरिडॉर आदीबाबत माहिती दिली.
डॉ. बुनगे यांनी जिवंतदात्याकडून करण्यात येणारे अवयवदान, मेंदूची मृतावस्स्थेत करण्यात येणारे अवयवदान, अवयवदान व प्रत्यारोपण कार्यक्रमाच्या मर्यादेबाबत माहिती दिली.
डॉ. सावरकर यांनी अवयवदानाची गरज, जीवितदाता, जीवित प्रत्यारोपणाचे प्रकार, अवयवदानासाठी पात्रता, क्षेत्रीय प्रत्यारोपण समन्वय समिती व भूमिका, अवयवदान प्रक्रियेविषयी जनजागृतीची आवश्यकता, अवयव प्रत्यारोपणाचे नियम, कायद्याबाबत माहिती दिली.
डॉ. भालेराव यांनी सादरीकरणाद्वारें अवयवदान व प्रत्यारोपणाची सद्यस्थितीबाबत माहिती दिली.
कार्यक्रमात उपअधिष्ठाता डॉ. अंजली शेटे, शरिररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अंजली पाटील, सहयोगी प्राध्यापिका डॉ.गीतांजली सुडके, भूलशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ.नेहा कांबळे, संध्या नाईक, विनायक साखरे आदी उपस्थित होत्या.