बारामती : तुळजाराम चतुरचंद कनिष्ठ महाविद्यालयात वाडःमय मंडळाचे उदघाटन संपन्न झाले. प्रसिद्ध ग्रामीण कथाकार व प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे यांच्या हस्ते हे उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वाडःमय मंडळाच्या माध्यमातून लिहिते व्हावे आणि स्वतःला सिद्ध करावे. गरजेपुरता मोबाईलचा वापर करून वाचन संस्कृती जोपासावी. आईवडीलांची सेवा करावी तसेच गोरगरिबांना दान करावे असे मौलिक विचार या प्रसंगी मांडून सद्यपरिस्थितीची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. त्यांनी कथाकथनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन व प्रबोधन केले.

        कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ.सीमा नाईक–गोसावी यांनी भूषविले. शब्दासोबत मैत्री करून मराठी भाषेची अस्मिता जपण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सचिन गाडेकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.वैशाली माळी, समन्वयक प्रा.गोरखनाथ मोरे, सर्व शिक्षक वृंद  आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वाडःमय मंडळ प्रमुख प्रा.संजय शेंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.स्नेहल कदम तर आभार प्रदर्शन प्रा.रमेश मोरे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर यांचे  या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed