बारामती : तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील कनिष्ट विभागाकडून राष्ट्रीय संस्कृत दिवस गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. डेक्कन अभिमत विद्यापीठातील संस्कृत व कोषशास्त्र विभागाचे संपादन सहाय्यक प्रा. डॉ. बन्सीकुमार लव्हाळे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते म्हणून बोलत असताना वरील उदगार काढले. संस्कृत भाषेचे उपयोजन व भविष्यातील संधी या विषावर हे व्याख्यान आयोजित केले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विविध संस्कृत स्लोकांचे उदाहरणे दिली. भारतीय तत्वज्ञानाला आधार असणाऱ्या आपल्या संस्कृतीला, समस्त ज्ञानशाखांना प्रज्वलित ठेवायचे असेल तर संस्कृत भाषा जिवंत ठेवणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी केले.
कनिष्ट आणि वरिष्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना संस्कृत विषय शिकवून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेचं प्रेम वाढवण्याचं काम महाविद्यालय करत आहे. असे प्रतिपादन कनिष्ट महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. वैशाली माळी यांनी अध्यक्षस्थानी बोलत असताना केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. वाणिज्य शाखा समन्वयक प्रा. संजय शेंडे शास्त्र शाखा समन्वयक प्रा.गोरखनाथ मोरे तसेच कनिष्ट आणि वरिष्ट महाविद्यालयातील प्राध्यापक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रणित वाबळे यांनी केले. सूत्रसंचालन कु. टिशा शहा तर आभारप्रदर्शन सुरज व्हनकळस यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.जवाहर शाह वाघोलीकर, सचिव श्री.मिलिंद शाह वाघोलीकर यांचे मार्गदर्शन लाभले.