बारामती, दि. १३: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे न्युरोसर्जन डॉ. संजय व्होरा व कर्करोग तज्ज्ञ डॉ. चकोर व्होरा महिन्याच्या तिसऱ्या शनिवार ऐवजी चौथ्या शनिवार २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहणार आहेत, याचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
डॉ. संजय व्होरा हे मेंदू व मणका विकार ग्रस्त आणि डॉ. चकोर व्होरा हे कर्करोगग्रस्त तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील रुग्णांवर विनामूल्य उपचार करणार आहेत. तसेच या महिन्यापासून स्थुलता व लठ्ठपणा निवारण शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. संजीव ठाकूर आणि अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. प्रसाद सुर्यवंशी हेदेखील प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी रुग्ण तपासणीसाठी येणार आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी दिली.