बारामती(प्रतिनिधी)दि.2 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाची पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक काल बारामती शहरातील रयत भवन येथे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी पश्चिम महाराष्ट्रतील विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आढावा बैठकी मध्ये प्रदेशाध्यक्ष मगरे यांनी जिल्हानिहाय संघटनात्मक बांधणीचा आढावा घेऊन.पक्ष आणि संघटना वाढी संदर्भात उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.तर येत्या काळात आपण महाराष्ट्रातील प्रत्येक भागात जाऊन आपण अशाच प्रकारे बैठका घेऊन पक्षाची मजबुतीने पुनर्बांधणी करणार आहे.तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देखील सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.तर लोकसभा निवडणुकीच्या आधी औरंगाबाद येथे महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांचे महाअधिवेशन घेणार असल्याची देखील माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी,राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,सुधाकर बागुल,ज्ञानेश्वर कांबळे,गोरक्ष लोखंडे, राजेंद्र जाधव,नितीन गायकवाड,मुनीर शेख,विकी लोखंडे,संजय अवसरमल,हरिश काकडे,ॲड राजु भोसले,सागर कांबळे,सुरेश माने,दिपक सोनवणे, संदिप कडाळे,गौतम शिंदे,अजित कांबळे, विशाल शेलार,सागर भालेराव,साधु बल्लाळ,सागर सरोदे,गंगा धेंडे,रेश्मा ढोबळे,संगिता पाटोळे,द्वारका कारंडे,मनीषा रघुवंशी व आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान या कार्यक्रमाचे सुत्र संचालन गजानन गायकवाड यांनी केले तर प्रस्तावना जिल्हा कार्याध्यक्ष गणेश सोनवणे आणि आभार तालुका अध्यक्ष रोहन गायकवाड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *