पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेच्या सल्लागार पदी बारामती मधून अविनाश सावंत तर पुरंदर मधून शिवाजी काकडे यांची निवड…

माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे) – पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर तसेच कोकण विभागातील रायगड जिल्हा असे सहा जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या, पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेच्या सल्लागारपदी बारामती तालुक्यातील धों.आ.सातव (कारभारी) हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे कार्यरत असलेले बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष श्री.अविनाश सावंत यांची तर पुरंदर तालुक्यामधून बा. सा. काकडे -देशमुख विद्यालय पिंपरे ता.पुरंदर येथे कार्यरत असलेले बारामती तालुका मराठी पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष श्री. शिवाजीराव काकडे यांची संस्थेच्या सल्लागारपदी निवड झाल्याचे पत्र संस्थेचे मार्गदर्शक श्री.एस.पी.जगताप यांनी त्यांना दिले.

 तीन हजार सभासद व सुमारे ५० कोटी रुपये भाग भांडवल असलेल्या या माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेची स्थापना १९७६ मध्ये झालेली असून, संस्थेला स्थापनेपासून ऑडिट वर्ग 'अ' मिळालेला आहे. वैयक्तिक सभासद कर्ज मर्यादा ३० लाख रुपये असून सन २०२२-२३ या अहवाल सालात संस्थेला सुमारे चार कोटी रुपये नफा झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सहकारी पतसंस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक असून सातारा जिल्ह्यातील श्री.गुलाबसिंग कदम यांच्या नेतृत्वाखाली संस्था आदर्श वाटचाल करीत आहे. रविवार दि.३ सप्टेंबर रोजी सातारा येथे होणा-या संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये निवडीबद्दल दोघांचाही यथोचित असा सन्मान करण्यात येणार आहे.

यापुढील काळात संस्थेची सभासद संख्या वाढवणे, सभासदांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना राबवणे, बारामती इंदापूर, पुरंदर , दौंड येथे नवीन शाखा सुरू करणे अशा गोष्टींसाठी प्रयत्न करणार असल्याचे संस्थेचे नवनिर्वाचित सल्लागार यांनी सांगितले. या निवडीबद्दल श्री.अविनाश सावंत यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.सदाशिव (बापूजी) सातव, शाळा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय (काकाजी) सातव, बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक संभाजीनाना होळकर ,बारामती सहकारी बँकेचे चेअरमन व संस्थेचे मार्गदर्शक सचिनशेठ सातव, सचिव सुरजशेठ सातव यांनी,तर श्री. शिवाजीराव काकडे यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी संघटनेचे नेते सतीशराव काकडे ,सचिव मदन काकडे , सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभिजीत भैया काकडे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *